Introduction

संगीतातील जातीयवाद...

3 टिप्पणी(ण्या)
खरतर आज खुप महिन्यांनी काहीतरी लिहितोय. आजही लिहिण्याचा मुडही नव्हता नि वेळ अक्षरश: ओढुन काढलाय. त्याला कारणही तसंच आहे.
आज स्वरभास्कर, भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांचे निधन झाले. खरेतर पुर्ण भारत वर्षासाठी ही दु:खद घटना! पण ह्यात सुद्धा काहीजणांनी जातीय भेदाच्या रानातील गप्पा मारल्या आहेत. वर आणखी सगळ्या ’डोमकावळ्यांना’ कावकाव न करण्याचा ’आदेश’ दिला आहे.

आजकाल हा एक नविन ’ट्रेन्ड’ आला आहे. ब्लॉग काढा नि जेवढी म्हणुन लोकांना आदरणीय नावे आहेत त्यांची नावे मस्तपैकी मोडतोड करुन वापरा. म्हणजे कसं की बाबा पुरंदऱ्या, बाळ टिळक, दादु कोंडदेव इत्यादी... तर सांगायचं म्हणजे ह्या ब्लॉगकर्त्याने त्याच्या मनात जेवढी पंडितांसाठी जागा होती तेवढ्या जागेत म्हणजे एका ओळीत ही बातमी सांगितली आहे. त्यात कुठेही ह्या भारतरत्नासाठी श्रद्धांजली नाही कि काही नाही. उलट भीमसेनांसाठी ह्यात मला तरी तिरस्करणीय भावनाच दिसली. (कदाचित मला काविळ झालेली असल्याने मला असे वाटत असेल!) आणि हे का तर भीमण्णांचे आडनाव ’जोशी’ असल्यामुळे!

अतिशय राग येतोय! तिळपापड झालाय अंगाचा! मी स्वत: ब्राम्हण... ओ... सॉरी...सॉरी... बामण नाहीये. पण तरीसुद्धा मला राग आलाय! दुसऱ्यांना जातीयवादी म्हणताना आपणपण तसेच वागणार आहोत का? का प्रत्येक वेळेला प्रत्येक क्षणी आपण समोरच्याची जात काढणार आहोत? कधी स्वत:ला सत्यशोधक तर कधी मी रानातला रांगडा गडी म्हणायचं नी दुसऱ्यावर गरळ ओकत बसायचं!

कुणी आता पंडितांनी गाणं शिकण्यासाठी केलेले कष्ट सांगितले तर हे अजुन काहीतरी तिरपागडं काढतील. म्हणतील ते कष्टांच आम्हाला काय सांगु नका, बहुजन समाज आज गेली अनेक शतके कष्ट करतोय पण त्याचं कौतुक कुणालाही नाही वगैरे वगैरे... ह्यांना वडाची साल वांग्याला लावायला चांगलचं जमतं. आणि ते काम ही लोकं अगदी बेमालुमपणे करतात.

अरे आपली लायकी काय, आपली पात्रता काय, काहीही बघायच नाही, फक्त जागा मिळालीय मग खरडा नि ओरडा... बाबासाहेबांबद्दल मलाही आदर आहे, गौतम बुद्धाला मीही देवच मानतो. पण ही लोकं आज खरच बाबासाहेबांच्या मार्गावरुन चालेली आहेत का? अरे आज तुम्ही लोकं अनेक चांगल्या ठिकाणी, चांगल्या जागांवर काम करत आहात पण तरीसुद्धा तुम्ही लोकं नुसत्या वागणुकीवरुन नी पेहेरावावरुन ओळखता येतात. नाही इथेही काही सन्माननिय अपवाद आहेत. पण दुसऱ्यांना नावे ठेवण्याअगोदर स्वत:ला सुधारा! बाबासाहेबांनी कष्ट घेऊन विद्या मिळवली, त्यांना नाही आरक्षणाची गरज पडली! आहे आज तुमच्यात हिंमत आरक्षण नाकारण्याची? नाही ना? आज कितीजणं जातीयता पाळतात? पण इतरांना नाव ठेवली की आपण प्रसिद्ध होतो हे ह्यांना बरोबर समजले आहे.

भीमसेनांना असं नावं ठेवण्याचा ह्यांना कोणी अधिकार दिला? पहिली रेषा छोटी करण्यासाठी आपली रेषा मोठी काढावी लागते! पण रेषा पुसण्यातच ह्यांना स्वारस्य आहे कारण श्रम कमी पडतात ना! बाबासाहेबांना इतरांना नाव ठेवण्याचा पुर्ण अधिकार होता! तो त्यांनी स्वकष्टांनी कमावलेला होता. तुमच्यासारखा तो त्यांनी ओरबाडण्याचा प्रयत्न नव्हता केला! आज आहे कोणी ’बहुजन’ समाजात भीमसेनांसारखं कष्ट करुन संगीत शिकलेला? जे आहेत त्यांनापण इतरांनी भीमसेनांसारखाच मान दिलेला आहे!

त्यातल्या त्यात हे बर वाटले की ह्या रानकोंबड्यांच्या मनात भीमसेनांबद्दल निदान एका ओळीची तरी जागा आहे. पण त्याचवेळी ह्याचही वाईट वाटलं की बहुजनसमाजातील लोकगायक शाहीर विठ्ठल उमप ह्यांच्या बद्दल ह्याच्या मनात तेवढीही जागा नाहीये. बरोबर आहे मनातली जागा बाकी सगळी विषाने भरलेली आहे ना, चांगल्यासाठी तो तरी अजुन कुठुन जागा आणणार!