Introduction

घरची लक्ष्मी

दोन दिवस घरी एकटाच होतो. गुरुवारी मामेबहिणीचं लग्न होतं. आई नि बायको दोघीही मंगळवारी संध्याकाळीच तिकडे गेल्या होत्या. जातानाच सांगुन गेल्या की सगळ आवरुन ठेवलं आहे. कुठे काय ठेवले आहे ह्याची एक उजळणीच सतत चालु ठेवली होती. दोघींचं म्हणनं एकचं "घर आहे तस ठेवा!"

हेच तर आम्हाला, म्हणजे मी, पप्पा नि भाऊ आम्हा तिघांना अवघड जाणार होतं! बुधवारी सकाळी ऊठल्यापासुन आमची बोंब सुरु झाली. एक वस्तु जागेवर सापडेल तर शपथ! मग चालु झाले आमचे फोन "अग! हे कुठेय?... अगं माझं आयडी कुठं ठेवलस?..." आणि हे फोन कराण्यात फक्त मीच पुढे होतो अस नाही तर पप्पा नि भाऊ दोघांनीपण "LOOP Mobile दान योजना" सुरु केली होती.

बुधवारीतर आम्हीपण लग्नाला गेलो, पण ह्या दोन दिवसात, आईच्या भाषेत सांगायच तर आम्ही घराचा ’उकिरडा’ केला होता! साल्या ह्या मुंग्याना पण लगेच समजत कि ह्या घरातली बाई कुठेतरी गेली आहे. त्या चारही कोपऱ्यांतुन सर्वत्र संचारास्तव निघतात. एकाच दिवसाचे कपडे बघितल्यावर तिघांनी पण ठरवुन टाकलं कि आता कमीत कमी ६ महिने तरी कपडे घ्यायचे नाहीत! जेवणाचे हाल जरा कमी झाले! कारण आता हॉटेल्स गल्लोगल्ली झाली आहेत ना!

गुरुवारी दोघी घरी आल्यावर घर जरा परत माणसांत आलं! लॅपटॉप लावण्यासाठी त्याचा अ‍ॅडाप्टर मला नेहमीच्याच जागी  मिळाला. दुसऱ्या दिवशी बनियान परत वॉशिंग मशिनवर होता नि माझं आय कार्ड बरोबर बॅगेतच होतं! मुंग्यांनी नि झुरळांनी माघार घेतली होती! आणि दोन दिवसांनंतर मी पुन्हा एकदा ताजं स्वच्छ पाणी पित होतो नि देवाला ही ’घरची लक्ष्मी’ बनवण्याची सुबुद्धी झाल्याबद्दल त्याचे आभार मानत होतो!









  सहजच एक सुचलं म्हणुन विचारतो, साफसफाइच्या ह्याच सारखेपणामुळे झाडुलापण ’लक्ष्मी’ म्हणत असतील का?

4 टिप्पणी(ण्या):

हेरंब म्हणाले...

हा हा .. मस्त एकदम.. घरोघरी मातीच्या चुली ;)

तळटीप मस्त आहे :)

Maithili म्हणाले...

:D Mastach...!!!

Harshad म्हणाले...

Ekdum khara ahe!

Santosh म्हणाले...

धन्यवाद हेरंब, मैथिली, हर्षद! आणि तुम्हा सगळ्यांना एकत्र प्रतिसाद दिल्याबद्दल माफी मागतो. पण मला एकेकाला प्रतिसाद कसा द्यावा ते समाजात नाहीय. पण तरीसुद्धा पुन्हा एकदा धन्यवाद.

टिप्पणी पोस्ट करा