प्रकरण १
मी सातवीत होतो. आमच्या वर्गात एक अतिशय सुंदर मुलगी होती. ती मला फार आवडायची.
बस्स...
प्रकरण २
दहावी...
सगळीकडुन सकाळ संध्याकाळ नुसतं अभ्यासाचं टेन्शन... सकाळी ह्या क्लासला जा, संध्याकाळी त्या क्लासला जा... आणि सकाळच्या ’ह्या’ क्लासचे सरच आम्हाला शाळेत गणित नि रसायनशास्त्र शिकवायला होते. त्यांनी बीजगणित-भुमिति मधले एकुणेक गणित क्लासमध्ये सोडवुन घेतलं होतं, त्यामुळे शाळेत आम्ही त्यांच्या क्लासचे जेवढे म्हणून विद्यार्थी होतो ते सर्व शाळेत एकदम सुममध्ये त्यांनी दिलेली गणितं सोडवुन वर्गात ’शायनिंग’ मारायचो.
असंच एक दिवस त्यांनी एक-दोन अवघड उदाहरणे घरुन सोडवुन आणायला सांगितली. मी नेहमीप्रमाणे ’शायनिंग’ मारली कि हि गणितं तर आम्ही कधीच सोडवली आहेत. झालं... वर्गातल्या एका लोकप्रिय-शिक्षकप्रिय मुलीने ते ऐकलं नि मला म्हणाली
"ए काशिद, तुझी वही मला दे ना!"
"अग, मी दिली असती पण आमचा परवा सकाळी क्लासमध्ये बीजचा पिरिएड आहे ग!’
"अरे, एवढच ना! मी तुझी वही उद्या वर्गात आल्या आल्या परत देईन, मग तर झालं ना!"
अगोदरच एका मुलीने वही मागितली म्हणून मी हवेत होतो आणि आता तिने एवढं प्रॉमिस केल्यावर मी कशाला नाही म्हणतोय!
"ए, पण नक्की दे ऊद्या."
असं म्हणुन मी तिला माझी वही दिली.
पण दुसर्या दिवशी तिला वर्गात न पाहून आमच्या, आमच्या कपाळात!
पहिला तास सुरु झाला. मॅडमनी हजेरी घेतली नि शिकवायला लागल्या... तेवढ्यात एक सुंदर मुलगी वर्गाच्या दरवाज्यात येऊन ऊभी राहिली.
"मॅडम, मी आत येऊ?"
"ये" इति मॅडम.
"हं, बोल!"
आता आमचं सर्वांचं लक्ष तिच्याकडे!
"मॅडम, मी आठवीतली ***, तुमच्या वर्गातल्या **ची मैत्रिण. मी तिच्या जवळच राहते. ती आजारी असल्याने आज येणार नाहीये!"
"एवढच सांगायचं होतं का?"
"नाही मॅडम, आणखी एक काम होतं, ही वही काशिदला द्यायची होती!"
आणि वर्गातल्या तमाम पोरांना चिरकायला एक कारण मिळालं!
"ए, हसायला काय झालं! गप बसा सगळ्यांनी"
मॅडम बोलल्या तशी पोरं गप झाली. मी ऊठलो नि वही घेऊन आपल्या जागेवर येऊन बसलो.
बस्स, पोरांना कारणच मिळालं, दुसर्या दिवसापासुन जो तो मला चिडवु लागला. माझं तर एकदम "Love at first sight" झालं होतं. मलातर ती जाम म्हणजे ज्यामच आवडली होती. म्हणून मी ते चिडवण एन्जॉय करत होतो. एके दिवशी माझ्या बेंचवर बदामच्या चित्रात मला माझे नि तिचे नाव लिहिलेले दिसले. मनातुन आनंदच्या उकळ्या फुटत होत्या तरी मी ऊगाचच रागवण्याचं नाटक करत होतो. माझ्याही वह्यांमध्ये पानापानावर तिचेच नाव दिसु लागले.
हळु हळु ही खबर माझ्या जवळच्या मित्रांना समजली. त्यांनी मला तिला प्रपोज करायचे सल्ले द्यायला सुरुवात केली. पण माझी हिंमत काही झाली नाही.
असेच अनेक दिवस गेले. ती वर्गात तिच्या मैत्रिणीला भेटायला आली कि माझा जीव वरखाली व्हायचा! नि मित्र मुद्दाम मला जोरात काहीही काम नसताना हाक मारायचे!
आणि एक दिवस
"अरे काशिद, तुझी *** आज मी आपल्या ** सरांच्या मुलाबरोबर बागेत गप्पा मारताना बघितली! एकमेकांना चिटकुन बसले होते यार!"
मनात विचार आला "आयला, त्याचा बाप सर आहे, नि आपल्याला शिकवतो. उगाच कशाला त्याच्याशी पंगा घ्या! एकतर आपलं दहावीच वर्ष. फुकट त्याचा बाप वर्षभर खुन्नस ठेवेल आपल्यावर!"
बस्स...
!! इतिश्री द्वितियोध्याय संपुर्णम !!
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा